बीड स्पीड न्यूज
केज_केज तालुक्यातील नांदुर घाट येथे काल ए.एस.पी पंकज कुमावत यांनी एका गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. यानंतर त्याच्याकडून माहिती घेत बीड तालुक्यातील इमामपुर येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला होता. या प्रकरणी आज केज पोलिसात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह इतर तीन जणांवर ३२८,२७२,२७३ कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती केज पोलिसांनी दिली आहे.
0 टिप्पण्या