Subscribe Us

header ads

नांदुरघाट येथे किराणा दुकानावर धाड; दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त

बीड स्पीड न्यूज 

केज_केज तालुक्यातील नांदुरघाट येथे किराणा दुकानावर धाड टाकून गुटखा माफिया यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करीत दीड लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला आहे. आयपीएस अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत हे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केज येथे रुजू झाल्यापासून त्यांनी गुटका माफिया, वाळू माफिया व जुगार अड्डे यांच्यावर धाडी टाकून अवैद्य धंदे नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधलेला आहे. दि. १६ नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ५:४५ च्या दरम्यान पंकज कुमावत यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, केज पोलीस स्टेशन हद्दीतील नांदुर घाट येथील रामहरी वैजिनाथ जाधव यांच्या सिद्धी विनायक किराणा दुकान आहे. या नावाच्या किराणा दुकानात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा साठा करून त्याची विक्री होत आहे. ही माहिती मिळताच अवैद्य धंद्यांचे कर्दनकाळ असलेले सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी त्यांचे पथकातील बालासाहेब दराडे, ए. एम. सय्यद, एस. एस. जाधव, सचिन अंहकारे, एस. बी. शेंडगे, विकास चोपणे, आर. टी. भंडाने, वंजारे व दोन पंच यांना सोबत घेऊन सरकारी व खाजगी वाहनाने नांदुरघाट येथील रामहरी जाधव यांच्या सिद्धी विनायक किराणा दुकानावर छापा टाकला. यात त्यांना एक्का, विमल, आर एम डी, रत्ना, गोवा, बाबा, राजनिवास गुटखा आणि जाफरानी जर्दा आशा सुगंधी तंबाखू असा एकूण १ लाख ५७ हजार २६५ रु. चा मुद्देमालासह रामहरी जाधव याला ताब्यात घेतले. रामहरी जाधव यांच्याकडे अधिक तपास करीत असता त्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना सांगितले की , त्याने हा गुटखा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील बालाजी पान मटेरियल या दुकानातून आणि बीड तालुक्यातील चौसाळा येथील नवसेकर यांच्याकडून खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा