Subscribe Us

header ads

गेवराईत मोठी कारवाई; 9 मोटार सायकलसह दोन आरोपींना अटक सपोनि साबळे यांच्या डी. बी.पथकाची कारवाई

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_गेवराई तालुक्यात अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. दरम्यान या मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा गेवराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून 9 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई डी.बी. पथकाचे प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या टीमने केली आहे.बीड जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी प्रत्येक ठाण्यात डी. बी.पथकाची स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये गेवराई पोलीस ठाण्यात या पथकाची जबाबदारी सपोनि प्रफुल्ल साबळे यांना देण्यात आली होती.दरम्यान या पथकाची नेमणूक केल्यापासून आतापर्यंत त्यांनी अनेक गुन्हे उघड केले असून काल पुन्हा 9 मोटारसायकलसह आरोपी संतोष बबन यादव (वय 29)वर्ष रा.दुरगुडपट पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) व निखील रंगनाथ घाडगे (वय 26) वर्ष रा. कांदळी वडगाव (ता.जुन्नर जि. पुणे) या मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे.या आरोपींकडून 9 मोटारसायकल जप्त करत गेवराई पोलीस ठाण्यात गुरनं 445/2021 कलम 379 भा. द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डीवायएसपी स्वप्नील राठोड व पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख प्रफुल्ल साबळे, जमादार विठ्ठल देशमुख, कृष्णा जायभाये, पो.ना.शरद बहिरवाळ, नारायण खटाने यांनी केली असून अधिक तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा