Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

बीड स्पीड न्यूज 

बीड,दि. 22 (जिमाका):- कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादर्भाव असल्याचे पार्श्वभूमीवर  राज्यातील कोरोना लसीकरण प्रमाण 74 टक्के असून बीड जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 55 टक्के आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत कमी आहे. शासनाने संपूर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्याटप्याने कमी केलेले असून संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षीत आहे. जेणेकरुन कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रभावीपणे आळा घालता येईल.

           

या अनुषंगाने लसीकरणावरील अंमलबजावणी साठी स्वत: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बीड शहरातील विविध ठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख व शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी होते.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास अंमलबजावणीचे आदेश

            शासनाच्या सूचना व लसीकरण मोहिम अधिक प्रभावीपणे राबविणेसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,बीड यांच्या कार्यालयामध्ये विविध शासकीय कामाच्या अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांसाठी पुढील आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

         

   प्रादेशिक परिवहन कार्यालय,बीड येथे Driving License, Learning Fitness certificate permit                    आणि इतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामकाजासाठी येणारे सर्व नागरीक/ वाहन प्रशिक्षण संस्थेचे चालक मालक व त्यांचे कर्मचारी यांनी कोविड 19 लसिकरणाची किमान पहिली मात्रा (डोस) पूर्ण केलेली असल्याबाबतची खातरजमा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांनी करावी.

            उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड येथे कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामकाजासाठी येणारे सर्व नागरीक / वाहन प्रशिक्षण संस्थेचे चालक मालक व त्यांचे कर्मचारी यांनी कोविड 19 लसिकरणाची किमान पहिली मात्र पूर्ण केलेली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.

           उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामकाजासाठी येणारे सर्व नागरीक/ वाहन प्रशिक्षण संस्थेचे चालक मालक व त्यांचे कर्मचारी यांनी कोविड 19 लसिकरणाची  पहिली मात्रा व दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांचे आवेदनपत्र स्वीकारण्यात यावेत, परंतू त्यांचे आवेदनपत्र निर्णय झाल्या नंतर संबंधितांना आवश्यक प्रामणपत्र निर्गमीत करण्यापूर्वी अर्जदाराने कोविड 19 लसिकरणाची दुसरी मात्रा घेतली असल्याबाबतची खात्री करावी नंतरच संबंधितांचे प्रमाणपत्र निर्गमीत करावे.

            उपरोक्त बाबींचे कटाक्षाने पालन करण्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांची राहील, असे अवाहन  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी  केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा