Subscribe Us

header ads

लसीकरण मोहिमअंतर्गत विविध आस्थापनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश जारी


बीड स्पीड न्यूज 

बीड,दि. 22 (जिमाका):- बीड जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 55 टक्के आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. शासनाने संपूर्ण राज्याच्या  क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्याटप्याने कमी केलेले असून संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षीत आहे. जेणेकरुन कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रभावीपणे आळा घालता येईल.

            राज्यशासनाच्या बैठकीतील सूचनानुसार सर्व शासकीय / निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनामध्ये प्रतिबंधात्मक लसिकरण तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने खालील मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड हे जिल्हा पोलिस अधीक्षक, बीड मुख्याधिकारी, नगर परिषद/ नगर पंचायत बीड व मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांना पुढील आदेशापर्यंत खालील प्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत :-

         

   जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांनमध्ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांच्या कोविड -19 प्रतिबंधात्मक लसिकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित  कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित / अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसिकरणासाठी काही अडचणी असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसिकरणांचे विशेष सत्र आयोजित करावे. जेणेकरुन  सर्व अधिकारी / कर्मचारी यांच लसिकरण पुर्ण होईल. याची खातरजमा करावी.

            ज्या गावात / वार्डात लसिकरणाचे प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकिय अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायत यांनी विशेष मोहिम राबवून जास्तीत जास्त नागरिकांचे लसिकरण करावे. व लसिकरणाचे / उदिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करुन त्या दृष्टीने कार्यवाही करावी.

            सर्व प्रकारचे दुकाने/ आस्थापनांतील हॉटेल व कामगार/ कर्मचारी यांच्या लसिकरणाची किमान 1 मात्रा पूर्ण झालेल्या असतील तीच दुकाने / आस्थापना यापूढे खुली करण्यास मुभा राहील. जिल्ह्यातील सव्र शासकीय / निमशासकीय कार्यालये / अनुदानित संस्था / विनाअनुदानीत संस्था व खाजगी आस्थापनामध्ये कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांना लसिकरणाची किमान 1 मात्रा झालेली नसल्यास त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. या बाबत नो व्हॅक्सीन नो एंट्री हा नियक अत्यंत काटेकोरपणे पाळला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. विविध मागण्याबाबत शासकीय कार्यालयात येणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्यांनाही कोविड 19 चा प्रथम डोस अनिवार्य डोस घेतल्याची खात्री केल्यानंतरच प्रवेश मिळेल. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशाकीय कार्यालयातून कोणतेही शासकीय प्रमाणपत्र / दाखला निर्गमित करण्यापूर्वी अर्जदाराने लसिकरणांचा किमान 1 डोस पूर्ण झाले असल्याबाबतचे प्रमाणत्र सोबत जोडलेले असावे. या बाबत सर्व कार्यालय प्रमुखांनी लसिकरणाबाबतची खात्री करुनच प्रमाणपत्र दाखला व निर्गमीत करण्याची कार्यवाही करावी.सर्व शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था , प्रशिक्षण केंद्र शिकवणी / क्लासेस इ. तत्सम संस्थांमध्ये लसिकरणाची किमान 1 मात्रा पूर्ण झालेल्या विद्यार्थी प्रशिक्षणार्थी कर्मचारी व अभ्यागतांनाच संस्थेच्या इमारतीच्या अथवा आवारात प्रवेश राहील या बाबतच्या सर्व सूचनांचे पालन करुन सर्व कोविड 19 प्रतिबंधात्मक बाबींचे संबंधीत सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य/ मुख्याध्यापक संस्था प्रमुख यांची असेल. यांचे उल्लंघन निदर्शनास आल्यास अशा संस्था सदर बाबीच्या पुर्ततेपर्यंत सिल करण्यात येतील. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांच्या प्रवेशव्दारावरच लसिकरणाची किमान 1 मात्रा झाली असलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जाईल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित धार्मिक व्यवस्थापनाची राहील. सर्व शासकीय / अशासकीय आस्थापनांवर कार्यरत अधिकारी/ कर्मचारी ज्याची लसिकरणाची किमान 1 मात्रा पूर्ण झालेली आहे. अशा अधिकारी/ कर्मचारी यांनी लसिकरणांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच संबंधितांचे डिसेंबर-2021 चे वेतन अदा करण्यात यावे.नो व्हॅक्सीन नो ट्रॅव्हल, बस या नुसार आंतरजिल्हा व आंतरराज्य बसने / खाजगी प्रवासी वाहनाने प्रवासी वाहनाने प्रवास करण्यासाठी देखील लसिरणाची किमान 1 मात्रा पूर्ण झालेली बंधनकारक राहील.

उपरोक्त सर्व बाबींसाठी अनिवार्य आहे.

मास्क्‍ वापरणे, गजदुरी, 6 फुट अंतर, सॅनीटायझर , आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य

           

मद्य विक्री करणाऱ्या, दुकानांना आदेश जारी 

           

जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने, वाईन बीअर शप देशी दारु दुकाने एफ एल 3 अनुज्ञप्ती धारक विक्रीची ठिकाणे, मद्य व मद्यार्क विक्रीची ठिकाणे, आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व व्यवस्थापकीय यंत्रनेतील अधिकारी, व्यवस्थापक, कामगार तसेच इतर राज्यातून आलेले कामगार नजीकच्या गावातून येजा करणारे कामगार सर्व कार्यरत मनुष्यबळ यांची  कोविड 19 प्रतिबंधात्मक लसिकरणाच्या दोन मात्रा पूर्ण असल्याची खातरजमा संबंधित आस्थापना प्रमुख यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित आस्थापना मालकाने कार्यरत मजूर, सेवक कर्मचारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावेत. ज्याचे लसिकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसिकरण केंद्रात जावे किंवा लसिकरणाचे विशेष सत्र आयोजीत करावे जेणेकरुन सर्वांचे लसिकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

            उपरोक्त नमूद सर्व दुकाने व अस्थापना व तत्सम सर्व उद्योग प्रकल्पाच्या ठिकाणी जेथे कामगार व कार्यारत मनुष्यबळाची वर्दळ असते अशा सर्व ठिकाणी लसिरकणाची किमान एक मात्रा पूर्ण केलेली असने आवश्यक व लसिकरणाची एकही मात्रा झालेली नसल्यास अशा कामगार व कार्यरत मनुष्यबळास कामाच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येवू नये. तसेच मद्य खरेदीकरीता येणारा ग्राहक, कामगार व कार्यरत मनुष्यबळाचे आधार कार्ड/ मोबाईल क्रमांकावरुन लसिकरण झाल्याची पडताळणी करण्यात यावी.

            सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती संस्था किंवा संघटणा यांनी अंमलवजावणी करण्यात टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बीड यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा