Subscribe Us

header ads

अंबाजोगाईतील त्या बलात्कार प्रकरणात पीडित मुलीचा धक्कादायक खुलासा!!

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई_ अंबाजोगाईतील त्या बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे बाहेर येत असून पतीच्या आणि माहेरी वडिलांच्या लैंगिक छळाला कंटाळलेल्या संबंधित पिडीतेवर रोज दोनपेक्षा अधिक जण बलात्कार करत असल्याची बाब समोर येत असतानाच लॉजवर पकडल्यानंतर पोलिसांनीही संबंधित पिडितेवर अत्याचार केल्याचा आरोप पिडितेने केला असून संबंधित मुलगी दोन  महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे. या आधी दोन ते तीन वेळेस तक्रार देण्यासाठी आपण पोलिसात गेल्याचेही मुलीने सांगितले आहे.
आठ वर्षाची असताना आई मरण पावली. वडिलांनी 13 व्या वर्षी बालविवाह लावून दिला. विवाहनंतर पतीच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने माहेर गाठलं. तिथंही वडिलांकडून लैंगिक छळ सुरू झाला. म्हणून घर सोडलं. जेवणाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अंबाजोगाईचं हे बलात्कार प्रकरण रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या पिडितेवर लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला जात होता. संबंधित पीडित मुलीला विश्‍वासात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलले असता हि  धक्कादायक बाब समोर आली असून लॉजवर पकडण्यात आल्यानंतर पोलिसांनीही तिच्या सोबत अत्याचार केल्याचे तिचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तपासात पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. सदरील मुलगी ही दोन महिन्याची गरोदर  असल्याचे समोर आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा