Subscribe Us

header ads

कुक्कडगाव ते पिंपळनेर डांबरी रस्त्याचे रुपांतर झाले पांदण रस्त्यात

बीड स्पीड न्यूज 

वाकनाथपुर प्रतिनिधी_ कुक्कडगाव ते पिंपळनेर हा रस्ता इतका खराब झाला आहे की गाडी चालवता ही येत नाही या रस्त्याचे डांबरीकरण राहिलेच नाही या रस्त्याचे रुपांतर पांदण रस्त्यात झाले आहे.  या रस्त्याने खुड्रस, वडगाव, गुंदा कुक्कडगाव या गावतील नागरिकांची रहदारी आहे. तरीही हा रस्ता बनवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. हा रस्ता खराब झाल्याने नागरिकांचे खूप हाल होत आहेत पावसाळ्यात या रस्त्यात अनेक गाड्या चिखलात फसल्या आहेत तसेच अनेक गाड्याचे नुकसान झाले आहे. तसेच कुक्कडगाव ते कुर्ला या रस्त्याचे देखील 

पांदण रस्त्यात रुपांतर झाले आहे. कुर्ला येथे माध्यमिक विद्यालय असल्याने या भागातील पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थी कुर्ला येथे शाळेत जातात पण रस्ता इतका खराब आहे की या रस्त्याने कोणतही वाहन जात नाही. या कारणाने या भागातील विद्यर्थ्यांना शाळेत जाता येत नाही या कारणाने विद्यार्थ्यांच्या खूप नुकसान होत आहे. तरी या दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे आशी या भागातील सर्व नागरिकांची मागणी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक