Subscribe Us

header ads

महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी तौफिक कुरेशी, उपाध्यक्ष राजेंद्र चांदणे तर सचिव पदी मुस्ताकीम कुरेशी यांची निवड जाहीर

बीड स्पीड न्यूज 


संघटनेचे अध्यक्ष अक्षय माने व जिल्हा अध्यक्ष वैभव थोरात यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप 



गेवराई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी तौफिक कुरेशी, उपाध्यक्ष राजेंद्र चांदणे तर सचिव पदी मुस्ताकीम कुरेशी यांची महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अक्षय माने व जिल्हा अध्यक्ष वैभव थोरात यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करून निवड जाहीर करण्यात अली. गेली अनेक वर्ष महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कामगारांच्या न्याय व हक्कासाठी काम करत आहे. विविध शासकीय योजना तसेच अडीअडचणी सातत्याने सोडवत अली आहे. काही दिवसांपूर्वी उमापूर ता.गेवराई येथे महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे संपर्क कार्यालयाचे जोमात उदघाटन करणारे तौफिक कुरेशी यांची  महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष अक्षय माने यांनी गेवराई तालुका अध्यक्ष पदी निवड केली तर तालुका उपाध्यक्ष पदी राजेंद्र चांदणे तसेच तालुका सचिव पदी मुस्ताकिम कुरेशी यांची निवड जाहीर केली. या पदाधिकारी निवडीच्या समारंभात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक भीमा बोबडे, शिवसेनेचे किरण आहेर, युवा नेते अक्षय थोरात, सखाराम तात्या चेडे, विवेक थोरात, अनिकेत डोळस, हकीम पठाण, किशोर कांबळे, विठ्ठल जाधव, गणेश बागडे, नाझीम पठाण, बाबू शेख, समीर पत्रकार, नाजीम कुरेशी, सलमान मणियार, नाझीम शेख, राजीव सौदागर, इलियास सौदागर, इरफान कुरेशी, अरबाझ शेख, सलीम भाई शेख, जमील पठाण, नदीम शेख, अरबाझ कुरेशी, मूज्जू कुरेशी, रईस कुरेशी, करीम कुरेशी, इसामिया कुरेशी, मोईन शेख, समीर शेख, शाहदात कुरेशी, फॅय्युम शेख, वाहेद शेख यांच्या सह उमापूर परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. तौफिक कुरेशी, राजेंद्र चांदणे व मुस्तकीम कुरेशी यांची निवड जाहीर झाल्यांनतर उमापुर येथील महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या संपर्क कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. एम. के कॉन्स्ट्रशनच्या मार्फत गेली अनेक वर्ष कुरेशी हे बांधकाम क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. त्यांच्या मार्फत गेवराई तालुक्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना येणाऱ्या काळात नक्कीच वाढेल असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष अक्षय माने यांनी दर्शवला.महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना बीड जिल्ह्यात वेगात वाढत असून अनेक कार्यकर्ते, कष्टकरी कामगार संघटनेचे सदस्य होत आहेत. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा स्थापन करण्याचा निर्धार जिल्हा पदाधिकारीकाऱ्यांकडून करण्यात आला असून गरीब कष्टकरी कामगाराच्या न्याय हक्कासाठी संघटना सदैव तत्पर राहील अशी गवाही महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अक्षय माने यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा