Subscribe Us

header ads

ट्रॅव्हल्स वाल्यांकडून खासगी प्रवाश्यांची लुट; दरवाढीला लगाम घालण्या बाबत राष्ट्रवादी कडून मागणी

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई प्रतिनिधी_खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या वाढीव तिकीट दरवाढीला लगाम घालून तिकीटांच्या बेलगाम दरवाढीवर प्रशासकीय पातळीवरून तात्काळ निर्बंध आणावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोमवार,दि.८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,खासगी प्रवासी वाहतूकदार यांनी वाढविलेल्या दरवाढीमुळे जनता ञस्त असून खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहतूक कंपन्यांनी आपले प्रवासाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे.सध्याचे प्रवासी दर नियमित दरांपेक्षा दुप्पट तिप्पट वाढले आहेत.दीपावली निमित्त ये जा करणाऱ्या सर्वसामान्य जनतेची गरज पाहून त्याला वेठीस धरून खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीवाल्यांनी तिकिटाचे दर बेसुमार वाढविले आहेत.
राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना खासगी प्रवासी कंपन्यांची ही लुट हानीकारक असून तिकीट दरवाढीला लगाम घालून तिकिटांच्या किंमतीवर  निर्बंध आणावेत ही मागणी या निवेदनातून केली आहे आणि तात्काळ कार्यवाही करावी खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी प्रवास भाड्यात केलेल्या दरवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी बीड यांना उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,माजी आ.पृथ्वीराज साठे, राजेश इंगोले, सुनिल जोगदंड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा