Subscribe Us

header ads

साडेचार हजार कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारला सात दिवसांची पोलीस कोठडी


बीड स्पीड न्यूज 

बीड_ समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या माध्यमातून अंदाजे साडेचार हजार कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या घोटाळेबाज महेश किसन मोतेवार याला येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मुदत उलटूनही ठेवी परत न केल्याने बीड शहर ठाण्यात सय्यद रहेमा सय्यद नियामत रा. इस्लामपुरा, बीड यांच्या तक्रारीवरून महेश मोतेवार, शशिकांत काळकर व सुनीता थोरात यांच्यावर ३० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा नोंद झाला होता. आतापर्यंत २२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. बीडमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक