Subscribe Us

header ads

बंद गोडाऊन फोडून स्ट्रिटलाईटचे साहित्य चोरणार्‍या तिघांना अटक


बीड स्पीड न्यूज 

बीड_ बंद गोडाऊन फोडून त्यातील स्ट्रिटलाईटचे साहित्य चोरणार्‍या तिघा जणांना शिवाजीनगर पोलिसांनी मुद्देमालासह पकडून त्यांच्याकडून 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरील कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गुरले यांनी केली.शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एलईडी स्ट्रीट लाईटचे बंद  गोडाऊन फोडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. कंपनीचे मॅनेजर संदीप रमेश बुरा यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास लावून तिघा जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली अंकुश देवकते (वय 22 वर्षे) गणेश प्रभाकर पांढरे (वय 20 वर्षे) आणि मंगेश शिवाजी राऊत (वय 30 वर्षे) सर्व रा.जातेगाव ता.गेवराई यांना जातेगाव येथून पोलिसांनी काल अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर असा एकूण 3 लाख 73 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले, सहायक फौजदार उत्तम चव्हाण, पो.ना. सचिन साळवे, निखिल गोडसे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा