Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांना मिळणार आधार;तपासणी शिबीरास उर्त्स्फुत प्रतिसाद दिव्यांग बांधवांचे प्रश्‍न आ.संदिप भैय्या क्षीरसागर प्राधान्याने सोडवतील-जि.प.सदस्या रेखाताई क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वतीने बीड विधानसभा क्षेत्रातील 80 टक्क्याहून अधिक दिव्यांग असलेल्या दिव्यांगांना मोफत मोटराईज्ड मोटर सायकल दिली जाणार आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून दिव्यांग बांधवांना आधार मिळणार आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या तपासणी शिबीरात उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला असून यामध्ये दीडशेपेक्षा 

अधिक दिव्यांगांची मुंबई येथील तज्ञ टिमच्या मदतीने तपासणी करण्यात आली. दिव्यांग बांधवांचे प्रश्‍न आ.संदिप भैय्या क्षीरसागर प्राधान्याने सोडवतील. दिव्यांग बांधवांचा विकास व त्यांच्या गरजा व त्यांचे मुलभूत प्रश्‍न सोडवत असतांना दिव्यांग बांधवांना कोणतीही मदत लागल्यास थेट भैय्या मदत करतील अशी ग्वाही बीड जि.प.च्या सदस्या रेखाताई रविंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे. त्या तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या तपासणी शिबीरात 200 हून अधिक दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. शनिवार दि.20 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रवादी भवन,बीड येथे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या विशेष सहकार्याने व 

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर, जिल्हा प्रशासन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड विधानसभा मतदार संघातील 80 टक्के व त्या पेक्षा जास्त दिव्यांग असणार्‍या दिव्यांगा मोफत मोटराईज्ड ट्राय सायकल (बॅटरी ऑपरेटेड) वाटपासाठी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी व नाव नोंदणी शिबीर यशस्वी करण्यात आले. या शिबीरात बीड मतदार संघातील दिव्यांगांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. एकूण 200 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 60 दिव्यांगांना मोफत मोटराईज्ड ट्रायसायकल वाटपासाठी पात्र ठरले आहेत. या दिव्यांगांना लवकरच आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मोफत मोटराईज्ड 

ट्रायसायकल वाटप करण्यात येईल. व 80 टक्क्यापेक्षा कमी दिव्यांग असणार्‍या बांधवांना शासनाकडून गरजेनुसार कृत्रिम साहित्य व साधने वाटप करण्यात येणार आहे. यावेळी बोलत असतांना रेखाताई क्षीरसागर म्हणाल्या की, आ.संदिप भैय्या बीड शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. दिव्यांग बांधवांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. त्यांनाही आपलं कोणी तरी आहे, आपलं समाजात कोणी कमी देखू नये यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पाहिजे ते आणि योग्य ती मदत केली जाईल. आ.संदिप भैय्या दिव्यांग बांधवांचे 

प्रश्‍न प्राधान्याने सोडवतील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या तपासणी शिबीरासाठी भारतीय कृत्रिम अंग निदान कानपुर येथून डॉ.संकेत बेरवलकर, विष्णु वैरागड, गजानन मस्के, समाजकल्याण विभाागचे नखाते, विशेष शिक्षक तांबडे, शिक्षिका आगळे, पीएससी सेंटरचे गणेश जाधव व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा वाघमारे ताई, शहराध्यक्ष रेहानाताई पठाण यांची विशेष उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीराम घुमरे व पदाधिकारील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा