बीड स्पीड न्यूज
गेवराई_कपड्याच्या गोदामाला अचानक भीषण आग लागून यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. हि घटना गेवराई शहरातील मोमीनपूरा भागात आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. माहिती मिळताच गेवराई नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते, तरी आग विझविण्यासाठी त्याठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.याबाबत माहिती अशी की, गेवराई शहरातील मोमीनपूरा भागात कोहीनुर कलेक्शनचे कापड गोदाम आहे. दरम्यान या गोदामाला आज शनिवार दि.20 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे आगीचे व धुराचे लोळ दिसू लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच गेवराई नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान मोमीनपूरा हे शहराच्या मध्यभागी असल्याने याठिकाणी अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाला अनेक अडचणींना सामोरे जाऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. परिणामी आग विझविण्यास विलंब लागत आहे. या आगीत गोदामातील कपडे पुर्णतः जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
0 टिप्पण्या