Subscribe Us

header ads

नोकरीचे आमिष दाखवत महिलेवर परळीत बलात्कार

बीड स्पीड न्यूज 

परळी_सोलापूरच्या 38 वर्षीय महिलेला परळी मध्ये नोकरी लावतो घर पाहून देतो असे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली असून एका 24 वर्षे युवका विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी परळीचा रहिवासी गणेश बाबुअप्पा कोडी (वय 24 वर्षे) राहणार जंगम गल्ली, गणेशपार, परळी याने सोलापूर येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय महिलेला पुण्याहून परळी येथे तुला नौकरी लावून देतो असे अमिष दाखवुन परळीत घेऊन आला परळीत आल्यानंतर रूम बघून देतो असे म्हणून दि.19 नोव्हेंबर रोजी रात्री व दि.२० नोव्हेंबर रोजी दुपारी बळजबरीने इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला. कोणास सांगितल्यास तुला परळीच्या बाहेरही जाऊ देणार नाही तसेच इथेच मारुन टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि पेंटकर हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा