Subscribe Us

header ads

कुंडलिक खांडेची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी!

बीड स्पीड न्यूज 

बीड_ शिव सेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर चार-पाच दिवसापूर्वी 34 लाख रुपयाच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कुंडलिक खांडे च्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे.नवीन जिल्हा प्रमुखाचे नाव लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याविरोधात 34 लाख रुपयांच्या गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. प्रशिक्षणार्थी सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर देखील कुंडलिक खांडे  बिनधास्त पणे फिरत होता. यानंतर सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका होऊ लागली होती. बीडची पोलीस यंत्रणा माफियांच्या हातातले बाहुले झाल्यामुळे कायदा हा सर्वसामान्यांनाच का? असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला होता. शेवटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रमुख बदलण्याचे आदेश दिले. जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती देऊन लवकरच नवीन जिल्हा प्रमुखाच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आला आहे. या संदर्भातले वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना ने दिले आहे. ‌कुंडलिक खांडे यांना पदावरुन काढण्यात आले आहे. कुंडलिक खांडेंसाठी हा मोठा धक्का असुन यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गणिते बिघडणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा