Subscribe Us

header ads

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मध्यप्रदेश राज्य संघटक पदी कमलेश राठोड यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी/ दि.27 बीड बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी अविरत संघर्ष करीत असलेल्या देशातील बंजारा समाजाची शक्तीशाली संघटना म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मध्यप्रदेश राज्याच्या प्रदेश संघटक पदी धिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी कमलेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मुंबई येथील अलिशान कार्यालयात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते मधूकर जाठोत, मुंबई प्रदेश अध्यक्ष बालाजी राठोड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.कमलेश राठोड हे बंजारा समाजाच्या प्रलंबित व जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी अखंडित काम करत आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.ते सातत्याने बंजारा समाजाच्या हिताचे उपक्रम आयोजित करुन समाजात प्रबोधन घडवून आणतात.त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष,प्रसिद्ध उद्योगपती तथा गोर धर्म प्रचारक आदरनिय किसनभाऊ राठोड यांनी त्यांची प्रदेश संघटक पदी नियुक्ती केली आहे.
कमलेश राठोड हे मध्यप्रदेश राज्यात भटके विमुक्त संघटनेचे प्रदेश पदाधिकारी असुन मध्यप्रदेश भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.मध्यप्रदेश राज्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेचा विस्तार करुन बंजारा समाजाची सामाजिक व राजकीय ताकद निर्माण करावी, आणि समाजाला संविधानिक हक्क व बंजारा तांड्यावर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव निर्माण करावा,अशा अपेक्षा कमलेश राठोड यांना नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांनी व्यक्त केल्या आहेत.
कमलेश राठोड यांच्या नियुक्तीचे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा बीडचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण,युवा उद्योजक पंडितभाऊ राठोड, राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास राठोड, प्रदेश अध्यक्ष डॉ.मोहन चव्हाण, प्रवक्ते गोर प्रकाश राठोड,प्रदेश प्रवक्ते अमोलभाऊ पवार, युवा प्रदेश अध्यक्ष विजय चव्हाण यांनी स्वागत करुन अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा