Subscribe Us

header ads

कोव्हीड प्रतिबंधासाठी जिल्ह्यात राबवली विशेष लसीकरण मोहिम जिल्हाधिकारी राधबिनोद शर्मा यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 

बीङ, दि. २८ :-जिल्हा लसीकरणामध्ये मागे राहणार नाही यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागात   नागरिकांना कोव्हीड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी आज विशेष मोहिम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी राधबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत  प्राथमिक आरोग्य केंद्र मोमिनपुरा बीड येथे विशेष लसीकरण मोहिमेचा पहिल्या लाभार्थ्यास डोस देऊन शुभारंभ करण्यात आला. आज विशेष लसीकरण मोहिमेच्या शुभारंभानंतर जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी मोहिमे अंतर्गत लाभार्थी 

कुटुंबाच्या घरी भेट दिली यावेळी लसीकरण करण्यात आले.  यावेळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सुरेंद्र डोके, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कासट, वैद्यकीय अधिकारी डॉ. हाश्मी हे उपस्थित होते.याचबरोबर जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी दिवसभरात विविध ठिकाणी मोहिमेत सुरु असलेल्या लसीकरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील उपळी ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेस भेट देऊन पाहाणी केली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखुन त्यापासुन संरक्षण देण्यासाठी संपुर्ण राज्यभरात लसीकरणावर भर देण्यात येत असुन अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याच्या सुचनाही शासनामार्फत देण्यात आल्या आहेत.  या धर्तीवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर देण्यात येत असुन आपला जिल्हाही लसीकरणामध्ये मागे राहणार नाही याची काळजी घेत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्यात येत आहे.बीड तालुक्यात नेकनूर, उमरी, राजुरी घेाडका सह विविध ठिकाणी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.  

ईट,  नाथापुर, मान्याचा वाडा येथे लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद दिसून आला. अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी आज टोकवाडी ता. परळी वैजनाथ येथे लसीकरण केंद्रास भेट दिली. यावेळी सभापती बालाजी मुंडे , डॉ राजाराम मुंडे तसेच गट विकास अधिकारी  व नायब तहसीलदार श्री. रुपनर उपस्थित होते. लसीकरणाचे प्रमाण कमी असलेली गावे,  नगरपालिका तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांची माहिती घेण्यात आली असुन लसीकरण पुर्ण करुन घेण्यासाठी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व गावातील व नगरपालिकांमधील नागरिकांचा लसीचा  डोस पुर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा