Subscribe Us

header ads

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांना भेटुन पंचायत समितीचे उपसभापती जानेमिया कुरेशी यांनी दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा

बीड स्पीड न्यूज 

परळी (प्रतिनिधि) परळी पंचायत समितीचे उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जानिमियां कुरेशी यांनी आज दीपावलीनिमित्त राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांची त्यांच्या परळी येथील जगमित्र कार्यालय या ठिकाणी भेट घेत दीपोत्सवानिमित्त पाडव्याच्या मुहूर्तावर दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा परळी पंचायत समितीचे कार्यक्षम उपसभापती जानिमियां कुरेशी यांनी आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा विशेष सहाय्य मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांची येथील जगमीत्र कार्यालयात भेट घेत दीपावलीनिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नामदार धनंजय मुंडे यांनी देखील परळी पंचायत समितीचे उपसभापती जानिमिया कुरेशी व त्यांच्या सहकाऱ्यांना दीपावलीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य वसंत तिडके, माजी सरपंच आक्रम पठाण, शेख नासेर, आरेफ कुरेशी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा