Subscribe Us

header ads

गुटखा प्रकरणी अजूनही मुख्य आरोपीला अटक का नाही!!!सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत म्हणून का!!!किंवा पोलीसांवर राजकिय दबाव आहे का???

बीड स्पीड न्यूज 

बीड_बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कुमावत यांनी नांदूरघाट, इमामपूर आणि बीडमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापे टाकले होते. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख खांडे फरार असल्याचं पोलीस रेकॉर्डवर आहे. मात्र फरार खांडे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांचे बीडमध्ये स्वागत करण्यासाठी जिल्हाप्रमुख म्हणून कार्यक्रमात हजर झाले. विशेष म्हणजे जाहीर कार्यक्रमात पोलिसांच्या समोर फरार आरोपी खांडे हजर होते. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.या प्रकरणी चार जणांवर गुन्हे नोंद झाले होते. यातील एकाला अटक करण्यात आली असली तरीही, अजून तीन जणांना अटक करण्यात आलेली नाही. आरोपी सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांना एक न्याय व इतरांना एक न्याय असे आहे का? कायद्यासमोर सर्व समान, यामुळे जे देोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा