Subscribe Us

header ads

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांचा दणका; एक कोटी रूपये पेक्षा जास्त रकमेचे बायोडिझेल ताब्यात

बीड स्पीड न्यूज 

केज दि.१९ – सहायक  पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैद्य धंद्या विरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असून तेहतीस लाख रुपयांच्या गुटख्यावर कारवाई होते ना होते तोच त्यांनी नांदेड पर्यत जाऊन सुमारे एक कोटी रूपये पेक्षा जास्त रकमेचे बायोडिझेल ताब्यात घेतले आहे.१८ नोव्हेंबर रोजी पंकज कुमावत यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत अशी माहिती मिळाली की, मुंबई व पुणे येथून बायोडिझेल घेऊन जाणारे चार टँकर हे केज मार्गे नांदेडकडे जात आहेत. माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी दि. १८ नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री ९:३० मस्साजोग येथे सापळा लावला. त्या वेळी त्यांना एक टँकर आढळून आले. पंकज कुमावत यांनी टँकरचा पाठलाग करून त्यांनी टँकरचा ड्रायव्हर याला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता हे टँकर बायोडिझेल घेऊन नांदेड येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. त्या नंतर पंकज कुमावत यांनी आपले पथकासह थेट नांदेड व लोहा गाठले. तेथे जाऊन त्यांनी नांदेड येथून व येथून (एमएच४६/जे इ ११०६), (एमएच-०४/ जीएफ-९८७३), (एमएच-२६/एच-८४९६) हे चार टँकर्स, एक स्कॉर्पिओ (एमएच-२१/एएक्स-१३५६) , ह्युंदाई (एमएच-२६/टी-९९९९) वेरणा या गाड्या ताब्यात घेतल्या. तीन टँकर्स मध्ये प्रत्येकी २५ हजार लिटर असे मिळून सुमारे ७५ हजार लिटर्स डिझेल भरलेले आहे. एका ट्रक मध्ये एक लोखंडी टाकी व डिझेल काढण्यासाठीचे मोटर्स ठेवलेली आहे. सदर प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा