Subscribe Us

header ads

नगरपालिकांची सदस्यसंख्या ठरली!

बीड स्पीड न्यूज 

बीड_राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी देखील आता घाई सुरु झाली आहे. राज्य सरकारने नगरपालिकांची सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नेमके किती नगरसेवक वाढणार हे स्पष्ट केले नव्हते, त्यामुळे प्रभाग रचना रखडली होती. आता अ आणि ब वर्ग नारपालिकेत २ तर क वर्ग नगरपालिकेत ३ नगरसेवक वाढविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बीड, परळी आणि अंबाजोगाई नगरपालिकांमध्ये प्रत्येकी २ तर धारूर, माजलगाव आणि गेवराई नगरपालिकेत ३ नगरसेवक वाढणार आहेत. या वाढीव संख्येनुसार तातडीने कच्ची प्रभागरचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा