Subscribe Us

header ads

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयावर बेमुदत आंदोलनाचा इशारा-- बीड जिल्हा महिला पदवीधर अंशकालीन अध्यक्षा योगिता शेळके

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी)_ पदवीधर अंशकालीन संघटना महाराष्ट्र राज्य गेल्या २० वर्षापासून नोकरीची वाट पाहत असून शासनाने जीआर काढून अद्याप पर्यंत अंमलबजावणी केली नसल्यामुळे सर्व पदवीधर अंशकालीन संघटनेने आपल्या उदरनिर्वाहासाठी लढा उभारला असून आयुक्त यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर, औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयावर सर्व पदवीधर अंशकालीन यांना सोबत घेऊन बेमुदत आंदोलन केले जाईल असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बीड जिल्हा महिला पदवीधर अंशकालीन अध्यक्षा योगिता शेळके यांनी दिला आहे .
   पुढे सांगितले की, सर्व ५५ वर्षाच्या आतील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना हक्काची नोकरी द्यावी, पगार नियमाप्रमाणे देऊन, ११ महिन्या नंतर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, ५५ वर्षाच्या वरील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून द्यावी, नसता त्यांच्या कुटुंबातील वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, व आज पर्यंत ज्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबातील वारसांना शासनाने मदत द्यावी, आंदोलनस्थळी या मागण्या केल्या जाणार असून पदवीधर अंशकालीन कर्मचारी उत्तम शिंदे, बाबासाहेब भोसले, वैशाली राणे, अफरोज कुरेशी, करपे नांदेड, जाधव, आमटे गेवराई, अशोक चव्हाण, शिंदे लातूर, दत्त वयाल, भैरू खांडेकर, पोपट धावारे, मोहन ताटे, ज्ञानेश्वर नागमोडे, सतीश शिंगाडे, दादासाहेब बनसोडे, दयानंद गिरी, रामदास चौरे, अशोक भोईटे, सुहास पाटील, नितीन गाडवे, सोमनाथ गणगे, तुकाराम पिंगळे, बाळासाहेब कसपटे, सुखदेव कारंडे, तानाजी बनसोडे, दयानंद कुलकर्णी, बाबा गोडगे, दादा पन्हाळकर, शांतीलाल काळपुंड, गोरख मोरे आदी पदवीधर अंशकालीन कर्मचारी औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयावरील बेमुदत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बीड जिल्हा महिला पदवीधर अंशकालीन अध्यक्षा योगिता शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा