Subscribe Us

header ads

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने संविधान तयार झाले आहे--- न्यायाधीश खाजा फारूकु अहमद

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी / दि.26 संविधान  दिना निमित्त न्यायधीश डाॅ.खाजा फारुख अहमद यांचे बीडकरांना संविधानाचे महत्त्व सांगणारे वैचारिक मार्गदर्शन लाभले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लाॅयर्स  सोशल फोरम यांच्या वतीने डाॅ. खाजा फारुख अहमद  जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना यांचे जाहीर व्याख्यान सामाजिक न्याय भवन बीड येथे झाले आहे.या वेळी न्यायधीश साहेब म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमानंतर भारतातील वंचित व बहुजन वर्गाला अधिकार देणारे सर्वाच्च अशा संविधानाच्या कलमात त्यांचे अधिकार संरक्षित करण्यात आले आहेत" . या कार्यक्रमाचे प्रमुख 

पाहुणे म्हणून अँड कृष्णा पंडित हे बीड चे ज्येष्ठ विधीज्ञ होते ते म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त जाती धर्माला न्याय व सन्मान देणारे संविधान अथक परिश्रमानंतर या देशाला दिले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. चंद्रमणी वीर असे म्हणाले की संविधानाची अंमलबजावणी पुर्णपणे झाली तर भारत सुजलाम सुफलाम होईल. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अँड. पंकज कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी अँड. सुनील वडमारे, अँड. लहु गंगावणे, अँड. श्रीकांत साबळे, अँड. लहु गंगावणे, तसेच सर्व लॉयरस फोरम चे पदाधीकारी व यांनी परिक्षरम घेतले  आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा