Subscribe Us

header ads

आम आदमी पार्टीच्या टेंबा अन्दोलनाने बीड शहर दनंनले

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_ बीड शहरांमधून आज आज रात्री आम आदमी पार्टीच्या वतीने आज संविधान दिनाच्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सविधान दिनाच्या संध्याला माल्यार्पण करून बीड शहरामध्ये टेंबा आंदोलनाला सुरुवात करण्यात आली बीड शहरातील नागरिकांची होत असलेली पिळवणूक अन्याय शहरातील नागरिकांच्या पैशाची होत असलेली लूट. शहरांमध्ये नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे अर्धवट कामे, नागरिकांना वेळेवर पाणी न भेटणे, संपूर्ण शहर अंधारमय  बीड शहरातील नागरिकांचे संपूर्ण टॅक्स वसूल करीत असून सुद्धा त्यांना अंधारात ठेवण्याचं पाप करत 

ही नगरपालिका करत आहे आहे या सर्व गोष्टींना बीड नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असुन नुसती बघ्याची भूमिका घेऊन मूग खाऊन गप्प बसून बघ्याची भूमिका घेतआहे. या गोष्टींना फक्त आणि फक्त कारणीभूत असणारे बीड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मा. उत्कर्ष गुट्टे साहेब हे आहेत सर्व काही गप्प बसून मुग खाऊन बघ्याची भूमिका घेत आहेत बीड शहराच्या मध्यभागातून सुंदर अशी वाहत असलेल्या बिंदुसरा नदी ला वाचवण्यासाठी संपूर्ण नदीपात्रामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून त्याकडे नगर प्रशासन दुर्लक्ष करत आहे व संपूर्ण शहरातील कचरा हा नदीपात्रात टाकण्याचे पाप हे अधिकारी करत असून नगरपालिकेच्या बीड शहरातील ज्या कंपनीला कचरा उचलण्याचे टेंडर दिले गेले त्या कंपनीला पाठीमागे घालण्याचं काम नगर प्रशासन करत आहे भोंगळट कारर्भारा मुळें संपुर्ण पंथ दिवे बंद आहेत नगरपालिकेचे संपूर्ण टॅक्स नागरिक भरतात मग शहरातील पथदिवे बंद का ठेवले याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व जनप्रतिनिधी वर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी बीड नगरपालिकेने बिंदुसरा नदी पात्रात स्वच्छता रॉ मटेरियल टाकून अतिक्रमण करून रोड बनवण्यात आलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी. बीड शहरामध्ये पाठी 

मागील काही दिवसापासून बीड नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे व घोटाळ खोरीमुळे बीड शहरातील  स्वराज्य नगर, गांधीनगर सुभाष रोड, अंकुश नगर, इमामपूर रोड बार्शी नाका, जवळपास संपूर्ण शहरातील पथदिवे बंद आहेत. तरी बीड नगरपालिका याकडे लक्ष देण्यास तयार नाही  बीड शहरामध्ये निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले रोड नाल्यांचे हे  नुसते उद्घाटन करण्यामध्ये व्यस्त आहेत. परंतु त्याच्या गुणवत्ते चे कोणीही काही बघण्यास तयार नाही फक्त गुत्तेदाराला पोहण्याचे काम करत आहे बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी याचे बीड शहरांमधील नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाची होत असलेल्या लूट मार इकडे बिलकुल लक्ष  देण्याचे काम करत नाहीत तरी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय उत्कर्ष गुट्टे साहेब. यांची बीड शहरातून तात्काळ बदली करण्यात यावी व बीड शहरामध्ये त्यांच्या देखरेखीखाली होत असलेले रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत तरी त्या रस्त्यांच्या कामाची चौकशी नेमण्यात यावी आणि दोषी अधिकारी कर्मचारी व जनप्रतिनिधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तरी या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आम 

आदमी पार्टीने टेबा आंदोल  जिल्हा अध्यक्ष अशोक येडे आम आदमी पार्टी बीड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ,माळीवेस,धोडीपुरा,कारंजा, नगरपालिका, ते जिल्हा अधिकारी कार्यालय या या मार्गाने करण्यात आले यावेळी आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष अशोक खाडे जिल्हा उपाध्यक्ष अक्रम शेख संघटनमंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत शहर प्रमुख सय्यद सय्यद सचिव रामदास जमाले रामभाऊ शेरकर कैलाश चंद पालीवाल मिलिंद पाळणे माऊली शिंदे बाळासाहेब घुमरे संतोष शिंदे अभिषेक टाळके योगेश पवार प्राध्यापक संदीप गाडगे आमटे सर इत्यादी कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा