Subscribe Us

header ads

500 पेन वाटून मातृभुमीत संविधान दिवस साजरा!

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड (प्रतिनिधी) पद्मश्री मनिभाई देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित "मातृभूमी" आदर्श सामाजिक प्रकल्प...येथे आयडियल सोशल एज्युकेशन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाळवंडी ता. जि.बीड येथे व संगमेश्वर विद्यालय येथे संविधान दिवस शाळेतील 300 व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 200 पेन वाटून साजरा करण्यात आला त्याचबरोबर विविध विद्यार्थ्यांनी संविधानपर भाषण केले यावेळी प्रकल्पाचे संचालक 

मा.ज्ञानेश्वर (अण्णा) राऊत यांनी देखील संविधान पर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आपले विचार व्यक्त केले व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजून सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रज्ञासूर्य मित्र मंडळाचे व आदर्श 

सामाजिक प्रकल्पाचे कार्यकर्ते अमोल, जाधव रोहन, जाधव मसू जाधव भिमराज जाधव ,नारायण राऊत, यांच्यासह महाविद्यालयातील पत्रकार सारिका गायकवाड व प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा