Subscribe Us

header ads

महिलांचे स्वातंत्र्य, हक्क ,आबाधित फक्त संविधानामुळेच -- प्रा. बालाजी जगतकर


बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

संविधान के सन्मान में एकल महिला संघटना मैदान में....

बीड प्रतिनिधी/भारत सरकारने 2015 पासून सर्व सामान्य लोकांना संविधानाचे महत्व समजण्याच्या हेतूने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असून त्याच्या माध्यमातून सर्व भारतीय जनतेस अमूल्य असे अधिकार प्रदान केले असून या दिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीत केलेल्या योगदानाची आठवण करण्यासाठी एकल महिला संघटनेच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुण सुरूवात, कोर्ट,तहशिल,पंचायत समिती, नगर रोड मार्गे स.मा.गर्गे   वाचनालया पर्यंत महिलांची रॅली काढण्यात आली, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन  बीड अक्षरधामचे संपादक प्रा.बालाजी जगतकर, भागवत वैध यांचे  संविधानावर मार्गदर्शन करणार आहेत  स.मा.गर्गे वाचनालय सभागृहात मान्यवारांची विचार व्यक्त करून  

समारोप करण्यात आला, या रॅलीत बीड शहरातील बहुसंख्य सामाजिक संस्था, संघटना, युवक, महिला व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते एकल महिला संघटनेच्या वतीने रुक्मिणी नागापुरे, मंगल कानडे, सरस्वती कळसकर, शिल्पा पंडित, संगिता मेटे, शोभा वाघराळ, भाग्यश्री तिडके, मीरा करांडे, मनीषा पवार, संगिता जाधव, रेश्मा सावंत, आस्विनी इतापे, अनिता राऊत, आस्विनी वीर, अलका हटवटे, आकुसा सापते, उल्फा लोखंडे,सपना ताई, गोदावरी घोलप, सपना आहिरे, कौशल्या कळसुले, कुशिवरता घोलप, असमा सय्यद, शेख अशाबी यांनी सविधान रॅलीत सहभागी घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा