Subscribe Us

header ads

बीड बसस्थानकातून 23 दिवसानंतर धावली बस गेवराईसाठी पहिली बस रवाना

बीड स्पीड न्यूज 

बीड_ बीड बस स्थानकातून शनिवारी (दि.27) प्रवाशांना घेऊन बस धावली आहे.प्रवाशांना अडचण होऊ नये यासाठी बस स्थानकात पोलिसांचा  बंदोबस्त ठेवण्यात आला असून विभाग नियंत्रक अजय मोरे हे स्वतः या ठिकाणी होते.परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिल्यानंतर बीड आगारातील दीडशे पेक्षाअधिक कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रशासकीय विभागातील ११४,कार्यशाळातील २८,दोन चालक आणि १ वाहक सेवेत रुजू झाल्यानंतर आज सकाळी 10.30 च्या 

सुमारास बीड बसस्थानकातून गेवराईसाठी पहिली बस रवाना झाली आहे.दरम्यान अनेक चालक आणि वाहक संपावर अजून ठाम आहे.गेवराईसाठी केवळ 6 प्रवाशी होते. दरम्यान आज बस धावणार हे जवळपास निश्चित होते.सकाळी 10.30च्या सुमारास बीडवरून_गेवराईसाठी पहिली बस रवाना झाली यामध्ये केवळ सहा प्रवाशी बसमध्ये होते.बीडवरून_केजसाठी बस सेवा सुरु दरम्यान सकाळी बीड_गेवराई बस सुटल्यानंतर आज दुसरी बस बीड_मांजरसुंबा_नेकनूर_केज बस प्रवाशांसाठी धावली आहे.आज सकाळपासून प्रवाशांच्या सोईसाठी बस सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा