Subscribe Us

header ads

शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा सस्पेन्स; इच्छुकांची मुंबईत ठाण!


बीड स्पीड न्यूज 

बीड_ कुंडलिक खांडे यांच्या शिवसेना  जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती मिळताच आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली आहे. असे असले तरी शुक्रवारी रात्रीपर्यंत निवड न झाल्याने सस्पेन्स कायम आहे. तर इच्छुकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. तसेच पदाला स्थगिती मिळालेले  कुंडलिक खांडे देखील गुरुवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी दुपारी शिवसेना भवनात दाखल झाले. तर  या घडामोडींमुळे पक्षश्रेष्ठींपुढेही नवा पेच निर्माण झाला आहे.शिवसेनेचे कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती मिळाली होती. केज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची तक्रार झाल्यानेच त्यांच्या पदाला स्थगिती मिळाली होती. परंतु स्थगिती मिळताच आता हे पद आपल्याला मिळावे, यासाठी माजी जिल्हा प्रमुखांसह इतर नवे पदाधिकारीही मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तीन दिवस मुंबईत राहून शिवसेना भवन व इतर कार्यालयांमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटी गाठी घेतल्या. त्यांचा सत्कार करून एकाच बाकावर सर्व इच्छुक बसल्याचे फोटो देखील व्हायरल झाले. परंतु अद्यापही निवडीबाबत पक्षश्रेष्ठींमध्ये विचार विनिमय सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. बीडमधून जेवढे इच्छुक गेले त्या सर्वांनी शिवसेना सचिव अनिल देसाई, संपर्क प्रमुख आनंद जाधव, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरूळकर यांच्या भेटी घेतले पक्षश्रेष्ठींनीही इच्छुकांच्या कामाचा 'लेखाजोखा' मागितल्याचे सूत्रांकडून समजते.त्यामुळे बीडमधून गेलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मनात धाकधूक कायम असल्याचे दिसते. आता हे पद कोणाला मिळणार, याकडे मात्र बीड  जिल्हावासीयांसह राजकीय कार्यकर्ते, नेत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

 
कुंडलिक खांडेंनी लावली पूर्ण ताकद

पदाला स्थगिती मिळालेले कुंडलिक खांडे यांना न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. पत्रकार परिषद घेऊन आपल्याला यात गोवल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी प्रस्थापितांवरही आरोप केले होते. दरम्यान, पत्रकार परिषद पार पडताच खांडे यांनी मुंबई गाठली. शुक्रवारी दुपारी शिवसेना भवनात जावून पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. आपले पद कायम ठेवण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा