Subscribe Us

header ads

धारूर घाटात पुन्हा अपघात; साखर घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला; तिघे गंभीर जखमी

बीड स्पीड न्यूज 

धारूर_ बारामतीहून मध्यप्रदेशकडे साखर घेऊन जाणारा एक ट्रक बुधवारी मध्यरात्री धारूर घाटातील  अवघड वळणावर अनियंत्रित होऊन दरीत कोसळला. यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धारूर-तेलगाव रस्त्यावरील धारूर घाटात अपघात होणे नियमीतच झाले आहे. बुधवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान बारामतीहून ३०० क्विंटल साखर घेऊन एक ट्रक (क्र एम एच 34 बी जी 4615 ) मध्यप्रदेशात रायपूरकडे जात होता. घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कठडा तोडून खोल दरीत कोसळला. यात चालक भास्कर गजानन घुले, तुषार रविशंकर पोयाम, संजय चंद्रभान थावरे ( सर्व रा.वनी.जि.यवतमाळ ) तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे एएसआय  गोंविद बास्टे, चालक संतोष बहीरलवाल, पोहेका. विश्वनाथ भताने यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने तिन्ही जखमींना बाहेर काढत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी तिन्ही जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सहापोलीस पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा