Subscribe Us

header ads

४थे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुरेश पाटोळे यांची निवड

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांना अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार जाहीर

बीड (प्रतिनिधी) दैनिक प्रभास केसरी आयोजित चौथ्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी कथाकार, लेखक तथा ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाटोळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यांची एकूण दहा पुस्तके प्रकाशित झाली असून 'पुळका' या कादंबरीला महाराष्ट्र राज्य सरकारचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार मिळाला आहे. यासह विविध सामाजिक संस्थेकडून त्यांना गौरविण्यात आले आहे.दिनांक ५ डिसेंबर २०२१, वार रविवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सभागृह, बीड येथे होत असलेल्या चौथ्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे उद्घाटक बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते जे. टी. साळवे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तम पवार, डी. पी.आय नेते अजिंक्य (भैय्या) चांदणे,  दै. रिपोर्टरचे संपादक तय्यबसाब आणि दै. राजयोगचे संपादक वैभव स्वामी असणार आहेत.संमेलनाच्या परिसंवादाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच. जी. विधाते तर प्रमुख वक्ते म्हणून सामजिक कार्यकर्ते अशोक तांगडे व सामजिक विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश नाईक सभागृहाला संबोधित करणार आहेत. कवी संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात अध्यक्ष म्हणून साहित्यिक अनंत कराड तर सहभागी कवी मध्ये प्रा. डॉ. विठ्ठल जाधव,
इंजी. निळूभाऊ सावर्गेकर,प्रा. चंद्रकांत साळवे, प्रा. डॉ. पांडुरंग सुतार आणि सुमंत गायकवाड यांचा समावेश आहे.
संमेलनाच्या चौथ्या सत्रात समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा अध्यक्ष मा. कॉ. नामदेव चव्हान व प्रमुख उपस्थिती  लसाकम प्रदेशाध्यक्षप्रा. संजय गायकवाड आणि देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी अण्णा भाऊ साठे जिवन गौरव पुरस्कार देऊन चंद्रकांत वानखेडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर अण्णा भाऊ साठे समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अदिती निकम (पुणे), मा. जोशीलाताई लोमटे (उस्मानाबाद), प्रा. डॉ.सरोज पगारे (औरंगाबाद), अभिनेता निळूभाऊ सावरगेकर (बीड), उपसंपादक रमाकांत गायकवाड (बीड) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभास केसरीच्या संपादिक सौ. अनुप्रिता मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 


पहिले सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
संमेलनाध्यक्ष- गझलकार प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे
दुसरे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
संमेलनाध्यक्ष- ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य माधव गादेकर
तिसरे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे फेसबुक लाइव्ह साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष- ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ ऋषिकेश कांबळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा