Subscribe Us

header ads

गेवराईत एकाच नंबरच्या आठ रिक्षा; पोलिसांनी केली कारवाई

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_ गेवराई शहरातील रस्त्यावर एकाच नंबरच्या आठ रिक्षा धावत होत्या. या आठही रिक्षांना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईची प्रक्रिया गेवराई पोलीस ठाण्यात चालू आहे. शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीचे व एकाच नंबरचे आठ रिक्षा धावत होती. याची कोणालाच माहिती नव्हती. विशेष म्हणजे रिक्षा मालक व चालक यांना देखील याची कल्पना नसल्याचे दिसून आले. परंतु डीपी पथकाच्या धडक कारवाईत अनेक गुन्हे उघड होत असून त्यांनी केलेल्या कारवाईत (एमएच 23 टीआर 311 ) या एकाच क्रमांकाचे आठ रिक्षा पकडण्यात आले आहेत.आठ ही रिक्षा गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. या एकाच नंबरच्या आठही रिक्षा मालक व चालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई डीपी पथकाचे प्रफुल्ल साबळे, जमादार विठ्ठल देशमुख, कृष्णा जायभाय, पोलीस नाईक नवनाथ गोरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा