Subscribe Us

header ads

चोरीच्या दोन गाई घेऊन जाणारे चोरट्याकडून पोलिसांवर दगडफेक

बीड स्पीड न्यूज 

बीड_जनावरांची चोरी करून मालवाहू जीपमधून पलायन करणाऱ्या चोरट्यांचा नागरिकांनी पाठलाग केला. नागरिकांच्या मदतीला पोलीसही धावले. चोर पुढे अन् पोलीस मागे असा खेळ सुरू झाला, पण चोरट्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने चोरट्यांची जीप उलटली. त्यानंतर चोरटे पसार झाले. ३१ रोजी पहाटे शहरातील नगर नाक्यावर हा थरार घडला.शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्यासुमारास मालवाहू जीप (एचआर ७३ ए. ५६५) मधून आलेल्या चोरट्यांनी बालेपीर भागातील चाऊस गल्लीतील मुदस्सीर गुड्डू चाऊस यांच्या दोन गाई चोरून नेण्याचा प्रयत्न केला. गाईंची चोरी झाल्याने मुदस्सीर चाऊस यांच्यासह अर्शद खान, शेख आकेफ, शेख सोहेल या तरुणांनी नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपासमोरून जीपचा पाठलाग सुरू केला. नगर नाक्याजवळ चोरट्यांच्या वाहनाच्या चालकाने पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गस्तीवरील पोलीस आले. त्यांनी पाठलाग सुरू केला, तेव्हा चोरट्यांनी जीपमधून पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली. सुदैवाने पोलिसांना दगड लागला नाही. मात्र, पोलिसांच्या तावडीतून निसटण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला अन् जीप उलटली. यानंतर जीपमधील सहा चोरट्यांनी वेगवेगळ्या दिशेने पोबारा केला.चोरीच्या दोन गाई घेऊन जाणारी जीप उलटल्याने जीपमधील दोन्ही गाई जखमी झाल्या. नागरिक व पोलिसांनी गाईंना सुरक्षितपणे जीपमधून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी गाईंना उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले.दरम्यान, जीपमध्ये टोमॅटोची ने-आण करण्यासाठीचे क्रेट आढळून आले. मात्र, त्यात दगड, गोटे होते. अपघातग्रस्त जीप शिवाजीनगर ठाण्यात आणून लावली असून, त्यात एक मोबाईल, ब्रेडची पाकिटे व गुंगीकारक औषधी आढळून आली. बेवारस व गोठ्यातील गाईंना बेशुद्ध करून त्यांची चोरी करणारी ही टोळी असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा