Subscribe Us

header ads

पोलीस उपनिरिक्षक अरुण डोंगरे यांचा सेवापुर्ती समारोप सोहळा अरुण डोंगरे यांच्या डॅसिंग आणि प्रामाणिक कामामुळे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावली-सुनील लांजेवार

बीड स्पीड न्यूज 

बीड दि.1 (प्रतिनिधी): पोलीसिंग कार्यपध्दतीमध्ये सध्याच्या काळात अमुलाग्र बदल झालेला आहे. पोलीस अधिकारी म्हणून बॅलन्सिंग काम करावे लागते. नागरिकांना विश्‍वास घेवून कार्य करणारा पोलीस अधिकारी काम करतांना यशस्वी होतो. पोलीस उपरिक्षक म्हणून कार्यरत असतांना अरुण डोंगरे यांची कार्यपध्दती डॅसिंग होती. खरं-खोटं सांगण्याचे धैर्य त्यांच्यात आहे. वडिलकीच्या नात्याने त्यांनी वेळोवेळी सल्ला दिला. पोलीस खात्यात अशा प्रामाणिक आणि इमानदारीने कार्य करणार्‍या अधिकार्‍यामुळे खात्याची प्रतिमा उंचावते, असे प्रतिपादन बीड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी केले.जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस उपनिरिक्षक अरुण डोंगरे यांच्या सेवापूर्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जगताप यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुनिल धांडे, दैनिक पार्श्‍वभूमीचे संपादक गंमत भंडारी, आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी पुढे बोलतांना अतिरिक्त पोलीस अधिक्षक लांजेवार म्हणाले, पोलीस निरिक्षक अरूण डोंगरे यांचे पोलीस खात्यात मोठे योगदान आहे. त्यांनी कर्तव्यतत्पर भावनेतून सातत्याने काम केल्यामुळे त्यांचा नावलौकिक झाला आहे.याप्रसंगी बोलतांना संपादक गंमत भंडारी म्हणाले, पोलीस खात्यात काम करतांना अरुण डोंगरे यांनी डाग पडू दिला नाही. याठिकाणी मांडलेल्या चित्रातून त्यांचा जीवनगौरव दिसून येतो. पोलीस कर्तव्यात चुकत नाही. पोलीस आणि पत्रकार कधी कर्तव्य करताना चुकत नाही. पत्रकार कधी सेवानिवृत्त होत नाही. अरुणराव डोंगरे हे कर्तव्यतत्पर आहेत. कष्ट, स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणामुळे आपण कार्यक्रमास उपस्थित राहिले. पोलीस उपनिरिक्षक अरुणराव डोंगरे यांनी घेतलेली फिर्याद आणि योग्य तपासामुळे माजलगाव तालुक्यातील एका खून प्रकरणातील 11 आरोपींना जन्मपेठ झाली, या घटनेचाही त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. तर महाभारतातील शकुनी मामाचे उदाहरण देवून शकुनी मामा व्हायला आवडेल, असे संपादक गंमत भंडारी यांनी यावेळी म्हटले.याप्रसंगी माजी आमदार सुनील धांडे, ह.भ.प. नारायण महाराज डिसले, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, सेवानिवृत्त प्राचार्य ए.आर. पाटील, अ‍ॅड. विवेकानंद सानप, प्रा. जे.पी. शेळके, सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक रामराम गाडेकर, सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे घोडके, आदींनी अरूणराव डोंगरे यांच्या कार्यकतृत्वाविषयी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढले.
सत्काराला उत्तर देतांना पोलीस उपनिरिक्षक अरुणराव डोंगरे यांनी ऊसतोडीचा उचलीसह सेवानिवृत्ती पर्यंतच्या संघर्षमय प्रवास जोशपूर्ण शब्दात मांडला. पोलीस वर्दी वाघाचे कातडे असल्याचे सांगून भरभरून प्रेम करणार्‍या समाजाला त्यांनी सॅल्युट केला.प्रारंभी राम डोंगरे, कृष्णा डोंगरे आणि हरि डोंगरे यांनी आपल्या वडिलांविषयी ह्रदयाला भिडणारे भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास सेवानिवृत्त होणार्‍या सहाय्यक फौजदार विष्णू डोंगरे, धोंडीराम नाईकनवरे यांचाही अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास गुणाजी मिसाळ, प्राचार्य सोमनाथ बडे, प्रा.आर.टी. गर्जे, सुभाषसेठ समदरिया, डॉ.सुधाकर आंधळे, सुधीर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक माने, प्रा.बंड, प्रा.हेमलता पाटील, वैजिनाथ तांदळे, भगिरथ दादा बियाणी, राजेंद्र बांगर, मोहनराव सिरसाट, विलास विधाते, वनवे मामा, डॉ. प्रशांत सानप, सरपंच भागवत सानप, नंदु वैद्य, नारायण नागरे, नानासाहेब सानप, आदीसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे राम डोंगरे, कृष्णा डोंगरे, हरि डोंगरे यांनी स्वागत केले. सर्व मान्यवरांचे हस्ते सत्कारमूर्ती अरुण डोंगरे आणि सौ.कौसल्या डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन माधव चाटे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा