Subscribe Us

header ads

बीडचा अक्षय शिंदे गाजवणार महाराष्ट्र केसरीचे मैदान

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_कुस्तीमध्ये बीडचा नावलौकिक करणारा पहिलवान अक्षय सखाराम शिंदे यंदाच्या वर्षी महाराष्ट्र केसरीचे मैदान गाजवणार आहे. अक्षय शिंदे हा यावर्षी 110 किलो वजनगटात सहभागी होणार आहे. 2017 मध्ये उपविजेता ठरलेला अक्षय यावेळी महाराष्ट्र केसरी होईल अशी अपेक्षा कुस्तीप्रेमींना आहे.महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार विजेते सखाराम शिंदे (शिवणी, ता.बीड) यांचा मुलगा असलेल्या अक्षयने अनेक विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. 2018 मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा जालना येथे झाल्या मात्र गुडघ्याला मार लागल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. तो 2021 च्या स्पर्धेसाठी आता सज्ज झाला आहे. 2017 मध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने उपमहाराष्ट्र केसरीची गदा मिळवली आहे. 2017 मध्ये जिरको कुस्ती स्पर्धेत तयाने महाराष्ट्र केसरीचे पदक मिळवले आहे.
बालेवाडी येथे यावर्षी होणार्‍या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत त्याने जिंकावे यासाठी कुस्तीप्रेमी धैर्यशीलकाका सोळंके, कुस्तीगीर परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष गोविंद चव्हाण, बालासाहेब घुमरे, प्रा.सर्जेराव काळे, सतीश पाटील, रौफ भाई व  जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा