Subscribe Us

header ads

मुस्लीम आरक्षणासाठी वंचित चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न


बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड(प्रतिनिधी )दि.२२-  वंचित बहुजन आघाडी बीड घ्या वतीने मुस्लिम आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखालीधरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी मुस्लीम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण कोर्टाने मान्य केले आहे त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी , धर्मा धर्मात समाजा समाजात दुही माजवण्यासाठी सोशल मिडिया वर केलेल्या पोस्ट साठी करीत कमी पाच वर्षांची शिक्षा व्हावी अशी तरतुद असलेले महंमद पैगंबर बील विथीमंडळाने पास करावे वक्फ बोर्ड व इतर देवस्थानच्या जमिनीवर होत असलेले अतिक्रमण दुर करावे धर्म प्रसारक साधु संत यांना वेतन सुरू करावे अशा प्रकारच्या मागण्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.या आंदोलनाला एम आय चे जिल्हाध्यक्ष ॳड शेख शफीक शेख निजाम जेष्ठ 

नेते खालेक पेंटर सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेशराव ढवळे प्रहारचे आर्जुन सुतार ऑल इंडिया पॅथंर सेनेचे नितीन सोनवणे यांनी सहभागी होवुन पाठिंबा दिला.
 या आंदोलनात विष्णु देवकाते वैभव स्वामी डॉ.नितीन सोनवणे, ज्ञानेश्वर कवठेकर, संतोष जोगदंड, भारत तांगडे, धर्मानंद साळवे, सुदेश पोतदार, दादासाहेब टाचतोडे, अनुरथ वीर, पुरुषोत्तम वीर, अनंतराव सरवदे, अंकुशराव जाधव, शेख युनुस, बालाजी जगतकर, बबनराव वडमारे, अजय सरवदे, किरण वाघमारे,लखन जोगदड, पुष्पाताई तुरूकमारे, अँड. अनिता चक्रे, विश्वजित डोंगरे,  अँड.पंकज कांबळे, बाळासाहेब गायकवाड, पप्पु गायकवाड ,संदीप जाधव,गणेश शिंदे, प्राज्वल वंजारे, भोले, आदींसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा