Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्यात आळ्या व किडे नागरिकांच्या आरोग्यास धोका .

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_  वाकनाथपुर येथील स्वस्त धान्य दुकानाच्या धान्या माला मध्ये अळ्या आणि किडे भरमसाठ आढळून आले आसून ते कसे खावे असा प्रश्न हे धान्य खरेदी  करणा-या लोकांना पडला आहे. त्यांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तहसिलदार यांना जेवणाचे निमंत्रण देवुन तक्रार करणार आहेत.सदरील स्वस्त धान्य दुकानावर मिळणारे धान्य हे 

जनावरांना खाण्यासाठी ही योग्य नसून ते मानवाला दिले जात आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात किडे आढळून आले असल्या मुळे. या धान्यात आळ्या झाल्याने तो माल नेण्यासाठी गावातील वाकनाथपुर चे  नागरिक हि  धजावत नसून नागरिकां मध्ये संताप व्यक्त केला जात आहे. थोडे का मिळेना पण चांगले अन्नधान्य द्यावी असा सूर जनतेमधून उमटू लागला आहे. तरी याकडे बीड च्या  

तहसीलदार यांनी तात्काळ लक्ष देऊन आम्हाला चांगल्या मालाचा योग्य पुरवठा करावा . ते जनावराना पण खाण्या योग्य नसुन ते मानवाला खाण्यासाठी दिला जात आहे. तरी चांगला माल राशन ला पाठवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नसता याच मालाची पोळी बनवून तहसीलदार यांना जेवणाला बोलणार असल्याचे वाकनाथपुर च्या गावातील लोकांनी सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा