Subscribe Us

header ads

प्राचार्या डॉ दीपा सावळे स्वाभिमानी शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे 

प्रतिनिधी -परांडा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांना स्वाभिमानी शिक्षक पुरस्कार देऊन रायगड फंक्शन हॉल उस्मानाबाद येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले .उस्मानाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित स्वाभिमानी शिक्षक संघटना मराठवाडा विभाग यांच्या शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी  मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2020 21 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिला शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .यामध्ये शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते स्वाभिमानी शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास पूजा ताई मोरे ,गजानन बंगाळे पाटील, हुसे सर, गंभीरे सर ,चौरे सर ,सोनटक्के सर, रवींद्र इंगळे ,तानाजी पाटील आदी उपस्थित होते .प्राचार्या डॉ दीपा सावळे यांना मिळालेल्या स्वाभिमानी शिक्षक पुरस्काराबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर ,संस्था अध्यक्ष सुनील शिंदे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद चे माजी संचालक प्राचार्य डॉ अशोक मोहेकर ,डॉ बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव येथील जिज्ञासा राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचे राज्य समन्वयक डॉ जयेंद्र लेकुरवाळे यांनी अभिनंदन व कौतुक केले .तसेच महाविद्यालयातील स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने, परीक्षा विभाग प्रमुख डॉ प्रशांत गायकवाड ,ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख ,कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दिवाने यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा