Subscribe Us

header ads

बीड पिंपळनेर रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावा या साठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड पिंपळनेर या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्ताच्या खड्ड्याने अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्यासाठी या भागातील नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत शुक्रवार दि १९ नोव्हेंबर रोजी या रस्त्यासाठी उमरद खालसा येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंप येथे या भागातील सर्व नागरिकांनी बैठक घेऊन या रस्त्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. आणि कोणत्याही राजकीय नेत्याने या वेळी आपली पोळी भाजण्यासाठी येऊ नये असे सर्वांच्या वतीने बोलण्यात आले आहे. या नुसार आज दिनांक २३ नोव्हेंबर वार मंगळवार रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे बहिष्कार टाकण्यासाठी या 

भागातील पंधरा ते वीस ग्राम पंचायत यांनी आपले ठराव देऊन मतदानावर बहिष्कार टाकला आहे आणि या रस्त्याच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.आंदोलन करून विविध मागण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे नीवेदन देण्यात आले निवेदनात बीड पिंपळनेर रस्ता होण्यासाठी सोमवार पर्यंत ठोस उपाय योजना करण्यात याव्यात या रस्त्याचे टप्या टप्प्याने काम न करता एकाच वेळी हा रस्ता पूर्णपणे निधी उपलब्ध करून करण्यात यावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रास्त्यासंबंधित कार्यभार असणाऱ्या आधिकार्‍याची बदली करून नवीन कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशा अनेक मागण्या मांडण्यात आल्या या वेळी प्रशासन आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या या भागातील शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा