Subscribe Us

header ads

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात यावे जिल्हाधिकारी यांना निवेदन पदवीधर अंशकालीन छत्रपती संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षा--योगिता शेळके

बीड स्पीड न्यूज 

आष्टी/बीड (प्रतिनिधी ) : पदवीधर अंशकालीन छत्रपती संघटना बीड यांच्या वतीने आज सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना रीतसर नियुक्तीपत्र देण्यात यावे, अशी मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचारी छत्रपती संघटनेच्या बीड जिल्हा महिला अध्यक्षा योगिता शेळके यांनी केली आहे .पुढे निवेदनात सांगितले की बीड जिल्ह्यात पदवीधर अंशकालीन ९०० च्या आसपास असून गेली २० वर्षापासून नोकरी साठी लढा देत असून काही कर्मचारी डिप्रेशन मुळे मृत्यू पावले असून काहींची वयोमर्यादा संपत आली असून अंशकालीन कर्मचारी खचत चालले आहेत, शासनाने जीआर काढून संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून सुद्धा पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया केली नाही, तरी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पदवीधर अंशकालीन छत्रपती कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा महिला अध्यक्षा योगिता शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली असून, याप्रसंगी निर्मला मस्के, सुमन शिंदे, भागवत गाडेकर, सुनील चव्हाण, झिंजुर्डे मॅडम, गोरख मोरे आदी पदवीधर अंशकालीन कर्मचारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा