Subscribe Us

header ads

एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्या भावासह चुलत भावाने केला अत्याचार!

बीड स्पीड न्यूज 

बीड_बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्या भावासह चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी एकास अटक केली आहे.पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्या भावासह चुलत भावाने लैंगिक अत्याचार केला. यामधून सदरील पिडीत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हि घटना समोर आली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके, सपोनि. योगेश उबाळे यांनी भेट दिली. याप्रकरणी सोमवार दि.29 रोजी रात्री सख्ख्या भावासह, चुलत भाऊ व अन्य एकावर कलम 376 ( 2 ) ( I ) ( N ) ( F ), 354 ( अ ) 34 भादवि सह ( N ) 3 , 8 , 12 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून इतर दोन आरोपींचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा