Subscribe Us

header ads

निवडणूक मतदानासाठी जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायत व 5 नगरपंचायतीच्या मतदानकेंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

 

बीड स्पीड न्यूज 

बीड,दि. 20 (जिमाका):- राज्य निवडणूक आयोग, महारसष्ट्र यांचे पत्र जाक्र. रानिआ/ ग्रापंनि-2021/ प्रक्र..01/ का-08 दि. 17 नोव्हेंबर 2021 अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता, किंवा इतर अन्य कारनांमुळे ग्रामपंचायती मधील रिक्त झालेल्या 123 ग्रा.पं.मधील 181 जागांचे पदांच्या पोटनिवडणूकींचा तसेच मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी त्यांचेकडील पत्र जा.क्र. रानिआ/ ग्रापंनि-2021 / प्र.क्र.06/ का-06 नि. 24 नोव्हेंबर 2021 अन्वये माहे एप्रिल 2020 ते माहे 2021 या कालावधीत मुदत समाप्त होणाऱ्या तसेच नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिलेला आहे. ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील 123 पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमधील 181 जागांचा व केज, आष्टी, पाटोदा, शिरुर का. आणि वडवणी या पाच नगरपंचायतचा समावेश असून त्यांचे दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. सदर निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपाती व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी या क्षेत्रात सिआरपीसी  144 (2) कलम लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा ,बीड यांनी दिले आहेत.सदरची निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी ‍दि. 12 डिसेंबर 2021 रोजी बीड जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायत व आष्टी पाटोदा,शिरुर का. आणि वडवणी व केज या नगरपंचायत चे मतदानासाठी मतदान केंद्राचे 200 मिटर परिसरात फौ. प्र.सं. 1973 चे कलम 144 (2) लागू करण्यात आले आहे.सदर आदेश निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही, मतदार केंद्राच्या परिसरात नियुक्त अधिकारी/ कर्मचारी यांना वगळून पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. परंतू जे मतदार मतदानासाठी रांगेत संबंधित मतदान केंद्रावर उभे असतील त्यांना हे लागू  राहणार नाही. मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनीक्षेपक वापरास, वाद्य वाजविणे, मिरवणुका काढणे यावर प्रतिबंध राहील. शासकीय वाहनाव्यतिरिक्त इतर अनधिकृत वाहनांना 200 मिटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येईल, हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयतीची अंत्ययात्रासाठी लागू राहणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा