Subscribe Us

header ads

मैंदवाडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत भाजपचे युवा नेते गणेश होळंबे यांची बिनविरोध निवड; पोटनिवडणुकीत भाजपचे परळी तालुक्यात खाते उघडले

बीड स्पीड न्यूज 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मैंदवाडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे युवा नेते तथा आक्रमकपणे विविध प्रश्नांवर आवाज उठवून भूमिका मांडणारे गणेश होळंबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. परळी तालुक्यातील पोटनिवडणुकीत भाजपाचे खाते उघडून जोरदार मुसंडी मारली आहे. ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गणेश होळंबे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. गावातील आवश्यक व मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सदस्य गणेश होळंबे यांनी सांगितले. तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक जाहीर झाल्या होत्या. त्यात मैंदवाडी ग्रामपंचायत एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या एकाजागेसाठी मैंदवाडी येथे भाजपाचे युवा नेते गणेश होळंबे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाचे युवा नेते गणेश होळंबे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  तसेच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी विद्यार्थी आघाडी पासून ते भ्रष्टाचार निर्मुलन समिती तसेच अनेक पदावर काम करत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असतात तसेच गणेश होळंबे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यापासुन निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गणेश होळंबे यांचा बीड जिल्हासह तालुक्यात दांडगा संपर्क असुन ते एक खुप चागले संघटक आहेत व विद्यार्थी , युवक कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. अशा जनसंपर्क असणारे भाजपाचे युवा नेते गणेश होळंबे यांची बिनविरोध मैंदवाडी ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यावेळी नवनिर्वाचित गणेश होळंबे म्हणाले की, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास करण्यासाठी कटिबध्द आहे. गावाच्या अतिशय महत्वाच्या पदावर माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करुन गावच्या विकासाला गती देण्यासाठी कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मैंदवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचे युवा नेते गणेश होळंबे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा