Subscribe Us

header ads

दारासमोर उभे असलेल्या बहिणींना स्कॉर्पिओने चिरडले

बीड स्पीड न्यूज 

बीड_पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रविवारी (दि.19) रात्री 8 च्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने दोन सख्या बहिणींना चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जेवण करून घराबाहेर उभे असलेल्या दोन सख्या बहिणींना भरधाव स्कॉर्पिओ एम.एच.12 एम.आर. 9113  च्या चालकाने चिरडले यात दोघींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना, जामखेड – पाटोदा रस्त्यावर धनगर जवळका गावात घडली आहे. रोहिणी महारुद्र गाडेकर (वय 26)  आणि मोहिनी महारुद्र गाडेकर (वय 22) असं मृत बहिणींचे नावं आहेत.या भिषण अपघातातील मयत मोहिनी ही डी.फार्मसीचे शिक्षण घेत होती. स्कॉर्पिओने या दोघी बहिणीसह आणखीन दोघांना चिरडले असून ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर पाटोदा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्कॉर्पिओ चालक फरार झाला आहे.अपघात घडताच परिसरातील नागरीकांनी मदत व बचाव कार्य केले. या प्रकरणी पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा