Subscribe Us

header ads

कुक्कडगाव रस्ता झाला अपघाताचे ठिकाण; बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचा रस्त्याकडे दुर्लक्ष!

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


वाकनाथपूर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचे कामे होत नाहीत ग्रामीण भागातील जनतेचा उपयोग फक्त मतदान करण्यापुरता केला जातो काही गावात डांबरी रस्ते नाहीत काही गावात रस्ते मंजूर होऊन देखील कामे अर्धवट करून सोडले आहेत. तर काही गावचे रस्ते इतके खराब आहेत. की वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते तर काही रोड वर मोठे मोठे खड्डे आहेत. की अपघात होऊन जीव देखील जाऊ शकतो यातील बीड तालुक्यातील कुक्कडगाव या गावाला डांबरी रस्ता आहे. पण कोठेही डांबर राहिले नाही याचं रस्त्यावर कुक्कडगाव जवळील 

वळणा जवळ एक छोट्या ओढ्यावर नळी टाकून पाणी काडलेले आहे. तीच नळी एक ते दीड वर्ष झाले रोड च्या दोन्ही बाजूने फुटून मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयात पडून कधी ही मोठा अपघात होऊ शकतो अनेक वेळा या भागातील नागरिकांनी फुटलेली नळी काढून दुसरी नळी टाकण्यात यावी याची मागणी करून देखील बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे तरी लवकरात लवकर ही फुटलेली नळी काढून दुसरी नळी टाकण्यात यावी आणि होणारा अपघात टाळावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा