Subscribe Us

header ads

माजलगाव पत्रकार सुरक्षा समितीचे मुकनायक पुरस्कार पत्रकार जितेंद्र सिरसाट व पत्रकार आशोक खाडे यांना जाहीर

बीड स्पीड न्यूज 

माजलगाव भुषण पुरस्काराने भाई गंगाभिषण थावरे,डाँ वसिम मनसबदार, आविनाश गोंडे,राहुल फुलगे,शिवहारी यादव, रुपचंद आभारे यांचाही होणार गौरव

माजलगाव : ( प्रतिनिधी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक समाजाला बोलते करण्यासाठी मुक नायक हे वृत्तपत्र सुरू केले होते या मूकनायक दिनाच्या निमित्ताने पूर्ण देशभरात वृत्तपत्र श्रृष्टीतील पत्रकार बांधव मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतात, या मुकनायक दिनाचे औचित्य साधून माजलगांव येथील पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने  मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देण्यात येणार असुन मुकनायक पुरस्कारासाठी बिड येथील निर्भीड पत्रकार व दै पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक जितेंद्र सिरसाट व दै.आदर्श गावकरीचे माजी उपसंपादक पत्रकार आशोक खाडे यांना जाहिर झाला असुन माजलगाव भुषण पुरस्कार  शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष भाई गंगाभिषण थावरे,माजलगाव.प सं.चे उपसभापती डॉ. वसिम मनसबदार,स्मार्ट आदर्श ग्राम पुरस्कार मिळालेले मोठेवाडीचे सरपंच आविनाश गोंडे,ज्ञानेश्वरी आर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल फुलगे,बडा बिझनेसचे शिवहारी यादव व माजलगाव तलाठी संघटनेचे अध्यक्ष रूपचंद आभारे यांना जाहिर करण्यात आला असुन या पुरस्काराचे वितरण मुकनायक दिनी विविध मान्यवरांच्या  उपस्थितीत पार पडणारअसल्याची माहिती,पत्रकार सुरक्षा समितीचे जेष्ठ पत्रकार प्रदिप कुलकर्णी व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.माजलगाव पत्रकार सुरक्षा समिती शाखा माजलगावच्या वतीने यावर्षी पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारासह माजलगाव तालुक्यातील सामाजिक कार्यात,आरोग्य रुग्ण सेवेमध्ये,उद्योजक,ग्रा.पं, सहकारा सह इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या बिड जिल्ह्याच्या व माजलगाव तालुक्याच्या मातीतील व्यक्तीस मुकनायक व माजलगाव भूषण पुरस्कार देऊन  यावर्षापासून सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे यावर्षीचे पत्रकारीतेतील योगदानाबद्दल बिड येथील निर्भिड पत्रकार तथा दै पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक जितेंद्र सिरसाट व माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी येथील उत्कृष्ट पत्रकार तथा दै आदर्श गावकरीचे माजी उपसंपादक पत्रकार आशोक खाडे यांना जाहीर करण्यात आला असुन, माजलगाव भुषण पुरस्कारा मध्ये मराठवाडा शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष भाई गंगाभिषण थावरे ( सामाजिक कार्य ),माजलगाव पं.स चे उपसभापती डाँ, वसीम मनसबदार ( रुग्ण सेवा ),माजलगाव तालुक्यातुन प्रथम स्मार्ट  आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त मोठेवाडी ग्रा.प.चे  सरपंच अविनाश गोंडे ( आदर्श सरपच ), ज्ञानेश्वरी आर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल फुलगे ( सहकार ),बडा बिझनेसचे शिवहारी यादव व उत्कृष्ट तलाठी तथा माजलगाव तलाठी संघटनेचे अध्यक्ष रुपचंद आभारे ( उत्कृष्ट तलाठी ) यांना माजलगाव भुषण पुरस्कार जाहीर झाले असुन मुकनायक व माजलगाव भुषण पुरस्काराचे वितरण लवकरच मुकनायक दिनी विविध नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती माजलगाव सुरक्षा समितीचे जेष्ठ पत्रकार तथा सा.माजलगाव परीसरचे संपादक प्रदिप कुलकर्णी,पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे, उपध्याक्ष ज्योतिराम पाढंरपोटे,सचिव अमर साळवे,संघटक विजय कापसे,पत्रकार राजेभाऊ पाष्टे,पत्रकार नय्युम आत्तार,पत्रकार वसंत परसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा