Subscribe Us

header ads

खाते 32 नंबरचे असले तरी काम एक नंबर करून दाखवतो - आष्टीत धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी आष्टी देवस्थान जमिन घोटाळ्याची चौकशी लावणार - नवाब मलिक

बीड स्पीड न्यूज 

आष्टी (दि. 20) ---- : लोकसंख्येतील 35% समाज घटकांशी थेट संबंधित असलेले सामाजिक न्याय खाते माझ्या पक्षाने मला दिले, या खात्यात चांगलं काम करून 32 नंबर वरून हे खाते एक नंबर वर नेऊ शकतो हे विश्वास माझ्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर व्यक्त केला. आणि ज्यांच्या कडे 4-4 खाते होते त्यांना मात्र जनतेने निवडणुकीत नाकारले, त्यामुळे त्यांनी आमची कुवत काढून बोलणे हास्यास्पद आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना लगावला.नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आज सकाळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व अल्पसंख्याक मंत्री नवाब भाई मलिक यांनी आष्टी येथील सभेत तुफान फटकेबाजी केली.सामाजिक न्याय विभागाचा 32 नंबर लागतो, 32 नंबर वाला मंत्री काय विकास करणार, अशा पंकजाताई मुंडे यांच्या टीकेचा 

धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला, ते म्हणाले सामाजिक न्याय विभाग तळागाळातील वंचित उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी स्वतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला आहे, या खात्याची अवहेलना करणे म्हणजे या खात्यांर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येकाची अवहेलना केल्यासारखे आहे.तीन जिल्ह्याचे आमदार म्हणवणाऱ्यांनी तर आष्टी शहरात भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्यांनी निर्माण केलेलं दहशत-दादागिरीचे वातावरण आता मुळासकट उखडून टाकण्याची वेळ असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.कोणाच्याही दहशत भीतीला न जुमानता आष्टी शहराचा विकास साधण्यासाठी स्वच्छ व प्रामाणिक प्रतिमा असलेल्या उमेदवारांच्या पाठीशी जनमत उभे करण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

*देवस्थान जमीन प्रकरणी चौकशी होणार*

दरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब भाई मलिक यांनी आष्टी येथील कथित एक हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी लावणार असल्याचे वक्तव्य आज आष्टी येथे केल्याने या प्रकरणात अडचणीत आलेल्या आ. सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारने केंद्रीय चौकशी यंत्रणांना हाताशी धरून हे सरकार पाडायचा व बदनाम करायचा प्रयत्न सपाट्याने चालवला आहे, मात्र ईडी सारख्या या या यंत्रणाच एक दिवस केंद्र सरकारचे दिवाळे काढतील, असेही नवाब मलिक म्हणाले.यावेळी व्यासपीठावर ना. धनंजय मुंडे, आ. बाळासाहेब आजबे, मा. आ. साहेबराव दरकेर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ शिवाजी राऊत, सतीश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, किशोर हंबर्डे, सुनील नाथ यांसह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा