Subscribe Us

header ads

नाकर्त्या उदासीन राज्य सरकारच्या धोरणामुळे ओबीसीचे आरक्षण गेले ;आरक्षण मिळेपर्यंत लढा चालू ठेवणार—प्रा.टी.पी.मुंडे

ओबीसी संघटना व ओबीसी बांधवांचे राजकीय आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणे आंदोलन संपन्न

जिल्हाधिकारी  यांना विविध मागण्यांचे ओबीसी जन मोर्चाच्या वतीने निवेदन सादर!

परळी वैजनाथ /प्रतिनिधी_सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका दुसऱ्यांदा फेटाळल्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आली आहे तसेच त्याला स्थगिती देण्यात आली आहे याचा फटका ओबीसी समाजाला बसला असून नाकर्त्या उदासीन सरकारच्या धोरणामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले तसेच ओबीसीचे आरक्षण मिळेपर्यंत चालू ठेवणार व स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आरक्षण मिळेपर्यंत पुढे ढकलावी अशा मागणी  ओबीसीचे जनमोर्चाचे उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी मागणी केली.बीड येथे दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे कोषाध्यक्ष चंद्रकांत बावकर तसेच उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे (सर) यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश धरणे आंदोलन बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध ओबीसी संघटना ओबीसी बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले तसेच जिल्हाधिकारी यांना जनमोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.आक्रोश धरणे आंदोलनाला संबोधित करताना प्रा. टी. पी. मुंडे सर यांनी राज्य सरकारवर कडाडून प्रहार केला तसेच राज्य सरकारने नऊ महिन्यांपासून एम्पिरिकल डाटा गोळा केला नाही तसेच सरकारने कोणतीही उपाययोजना केली नाही. उलट सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. राज्य सरकारने संपूर्ण ओबीसी समाजाची ओबीसीत असणाऱ्या विविध जातींची फसवणूक केली.ओबीसी समाजातील राजकीय नेते यांना ओबीसी आरक्षणाचे काहीही देणे घेणे नसून ते पक्षाचे बांधील आहेत मंत्रिमंडळात ओबीसी नेते असून सुद्धा ओबीसी प्रश्नावर मुग गिळून गप्प का आहे असा सवाल त्यांनी केला तसेच ओबीसी समाजातील विविध जातींनी जागृत होऊन अशा नेत्यांपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनाची सुरुवात वाद्यांच्या गजरात हलगी संबळ वाद्यांच्या गजरात सुरुवात झाली ओबीसी प्रमुख नेत्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले.यावेळी ओबीसी जन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रफिक भाई कुरेशी, सूर्यकांत मुंडे विनायक गडदे बाबासाहेब काळे छत्रपती कावळे माणिक सलगर जि प सदस्य प्रदीपभैया मुंडे,श्याम  गडेकर भागवत सलगर अँड संजय जगतकर, जमू सेठ, राजेश मोराळे, रेशीम नाना कावळे,अशोक मोराळे इंद्रजीत दहिफळे नवनाथ शिरसागर विश्वनाथ देवकर नागेश वावळे रवींद्र पापा गीते दौलत ढाकणे मधुकर ढाकणे राहुल कांदे शिवा चिखले भागवत बप्पा गडदे हनुमंत रुपनर सय्यद बबलू भाई शेख इलियास शेख मुस्तफा  मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे, राजाभाऊ तांदळे, भगवान गीते बाळासाहेब मुंडे, रामधन घुगे, धनंजय कावळे बंकटी ढाकणे, आदीसह ओबीसी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा