Subscribe Us

header ads

धक्कादायक ; कोरोना मृतांच्या यादीमध्ये जिवंत 216 व्यक्तींची नावे,

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई_ आरोग्य खात्याच्या नोंदीनुसार अंबाजोगाई तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 316 असताना शासकीय मदतीसाठी देण्यात येणाऱ्या यादीत 532 नावे समाविष्ट केली आहेत. अधिक माहिती घेता मृतांच्या यादीत चक्क जिवंत असलेल्या व्यक्तींचा समावेश केल्याचे आढळून आले असून प्रशासनाचा सावळागोंधळ पुन्हा समोर आला आहे.कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनातर्फे 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. या अनुषंगाने महसूल व स्थानिक प्रशासनाकडून यादी केली जात आहे. अंबाजोगाई शहरातील मृतांची यादी तहसीलदार विपिन पाटील यांनी अंबाजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविली. नगर परिषदेच्या वतीने या यादीची पडताळणी करताना शहरात जिवंत असणाऱ्या व्यक्तींचाही मृत म्हणून समावेश झाल्याचे उघड झाले. नगर परिषदेचे कर्मचारी आज सामाजिक कार्यकर्ते नागनाथ वारद यांच्या कुटुंबाकडे माहिती घेण्यासाठी गेले. यावेळी आपले नाव मृतांच्या यादीत समाविष्ट असल्याचे पाहून खुद्द नागनाथ यांना धक्काच बसला. असाच प्रकार त्याच परिसरात राहणाऱ्या दुसऱ्या कुटुंबाच्या बाबतीत घडला. जिवंत व्यक्तींची नावे मृतांच्या यादीत समाविष्टच झालीच कशी, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.मृत 316 तर यादीत 532 नावे अंबाजोगाई तालुक्यात कोरोना मुळे  आतापर्यंत 316 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मात्र, मृतांच्या यादीत 532 नावांचा समावेश आहे. ही उर्वरित 216 नावे आली कुठून, याचा शोध आता प्रशासकीय यंत्रणेला घ्यावा लागणार आहे. या यादीत आणखी किती जिवंत व्यक्तींचा समावेश झाला आहे, त्याचीही पडताळणी करावी लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा