Subscribe Us

header ads

इमामुना महेदी ए माऊद (अ.स.) यांच्या मिलाद (जयंती) निमित्त इज्तेमाई मिलादी जलसा संपन्न

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) - इमामुना हज़रत सय्यद मुहम्मद महेदी ए माऊद (अ.स.) यांच्या मिलाद निमित्ताने शहरात इज्तेमाई मिलादी जलसा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.महेदवीया समाजाचे संस्थापक इमामुना हज़रत सय्यद मुहम्मद महेदी ए माऊद अलैहिस्सलातुस्सलाम यांच्या मिलाद निमित्ताने इज्तेमाई मिलादी जलसा एल.एम.एम. ग्रुप व जमाअ्त ए महेदवीया बीड च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या मिलादी जलसा मध्ये पीर ओ मुर्शीद हज़रत सय्यद रोशन मियाँ, हज़रत सय्यद अथन सलमान मियाँ, हज़रत सय्यद नुसरत तनवीर मियाँ यांनी दिन ए इस्लाम व महेदवीयत विषयी मार्गदर्शन केले. तर नुसरत मियाँ यांनी किरात पठण केले. या मिलादी जलसा च्या आयोजनाकरिता एल.एम.एम. ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर उर्फ फ़र्रूख़ भाई व सय्यद ज़ाफ़र सादेख़ भाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा जलसा जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटीचे सचिव तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. जलसा मध्ये महेदवीया जमाअ्तचे ज्येष्ठ सदस्य मुहम्मद अब्दुल सत्तार, मुहम्मद इस्हाक़, मुहम्मद मुस्तफा हन्नूरे, मुहम्मद अय्युब, मुहम्मद अब्दुल रऊफ़, मुहम्मद उस्मान, शेख ज़ुबेर, मुहम्मद अब्दुल ख़दीर, लईख़ मुहम्मद, परवेज़ मुहम्मद, शेख अब्दुल हमीद, शेख जावेद, मुहम्मद आरेफ़, शेख वसीफ़, शेख नसीर, मुहम्मद इलयास हावरे, शेख ज़फ़र, शेख सईद, शेख वासेख़, शेख लईख़ यांच्यासह बीड शहरातील महेदवीया जमाअ्तचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा