Subscribe Us

header ads

चऱ्हाटा फाटा येथे क्लबवर छापा; भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केसह 50 जणांवर गुन्हा,75 लाखांचा मुद्देमाल जप्त; सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई!

बीड स्पीड न्यूज 

बीड_बीड शहरापासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरातील राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी काल (28 डिसेंबर) रात्री 11वाजता छापा टाकला. यावेळी 48 जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार, मोबाईल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 48  जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघे फरार असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे. राजेंद्र मस्के यांचाही आरोपीत समावेश असल्याने एफआरआयमध्ये त्यांचे नाव आहे.

राजेंद्र मस्केंनी आरोप फेटाळले

दरम्यान, माझा आणि जुगार अड्ड्याचा काहीही संबंध नाही. ती जागा माझ्या मालकीची नाही, तर माझे भाऊ मदन मस्के यांची आहे, असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून मला गोवलं जात आहे. पोलिसांनी कसलीही चौकशी न करता माझे नाव घेतले. मी न्यायालयात दाद मागणार, अशी प्रतिक्रिया राजेंद्र मस्के यांनी माध्यमांसमोर दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा